Sunday, 20 May 2018

डिजिटल मार्केटिंग का? आणि कशासाठी?





फेसबुक इन्सटाग्रामवर एका पाठोपाठ येणाऱ्या स्पॉनसर्ड पोस्ट पाहून, हल्ली प्रत्येकाला आपल्याही व्यवसायाची अशी जाहिरात असावी, असं वाटू लागलंय. काही व्यवसायिक आपल्या जाहिरातींचा संपूर्ण पॅटर्नच बदलत आहेत. तर काहींनी डिजिटल मीडियाकडं वळायला सुरुवात केलीय. असं असूनही सध्या आपला व्यवसाय व्यवस्थित चालतोयमाझा व्यवसाय तर खूप छोटा आहे. माझा ग्राहक तर लोकलच आहे. मग मला डिजिटल मीडिया का आणि कशासाठी?’ अशी शंका आजही अनेकांच्या मनात आहे. भारतात दुर्दैवानं अशा व्यवसायिकांची संख्या आजही लक्षणीय आहे. म्हणजेच त्यांना डिजिटल मीडिया मार्केटिंग हा विषयच पूर्णपणे कळालेला दिसत नाही. मुळात हा मीडिया एखाद्या छोट्या किराणा माल व्यवसायिकापासून ते सराफ व्यवसायिकासाठीही फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळं आज इथं डिजिटल मीडिया मार्केटिंग कशासाठी हवं आणि त्याचे फायदे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करुया.

डिजिटल मीडिया २०१८
डिजिटल मीडियाची माहिती घेण्यापूर्वी या वर्षी या मीडियामध्ये कोणत्याप्रकारची उलाढाल होणार आहे, यावर एक नजर टाकायला हवी.
  • जगभरात ५० टक्के व्यवसायिकांचा यावर्षीचा डिजिटल मीडियाचा प्लॅन तयार
  • सुमारे ८० टक्के व्यवसायिकांना पारंपरिक पद्धतीनं मार्केटिंग करणं आता उपयोगाचं नाही, असं वाटतंय. तसच डिजिटलच्या माध्यमातून जवळपास ३० टक्के व्यवसाय वाढ होण्याची खात्री वाटतेय. 
  • यावर्षी ८० टक्क्यांहून व्यवसायिक, संस्था आपलं ऑनलाईनसाठीचं बजेट वाढवण्यास तयार


 डिजिटल मीडियाची माहिती घेताना गुगलच्या स्मॉल अॅन्ड मिडियम इंडस्ट्रिज, एशिया पॅसिपिकचे प्रमुख, केविन ओ`केन यांचं एक स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं ठरतं. केन म्हणाले, छोट्या आणि मध्यम उद्योग, व्यवसायांच्या प्रगतीसाठी डिजिटल मार्केटिंग हे रॉकेटच्या इंधनासारखे काम करेल. देशात आणि एकूणच जगात डिजिटल माध्यमाचा होत असलेला वापर लक्षात घेतला. तर, याच माध्यमातून आपली जाहिरात करून आपल्याला हव्या असलेल्या ग्राहकापर्यंत पोहोचणं व्यवसायिकांना, उद्योजकांना शक्य होत आहे. येणाऱ्या काळात हे चित्र आणखी वेगानं बदलणार असून, जाहिरातींसाठी केवळ हे माध्यम सर्वाधिक वापरलं जाणार आहे.

डिजिटल मार्केटिंगची ढोबळ वैशिष्ट्ये
  • मार्केटिंगमध्ये आणता येणारे वैविध्य
  • जाहिरात किंवा कंटेंट टार्गेटेड ग्राहकांपर्यंत वेगाने पोहोचवण्याची क्षमता
  •  संख्यात्मक रिझर्लट मिळण्याची हमी


डिजिटल मार्केटिंग सर्वांना समान संधी
ऑनलाईन ब्रँडिंग किंवा मार्केटिंग करणाऱ्या प्रत्येक व्यवसायिकाला डिजिटल मार्केटिंग समान संधी देतंय. मल्टिनॅशनल कंपन्या आणि बड्या उद्योजक घराण्यांचा मार्केटिंग क्षेत्रात असणारे वजन जणू डिजिटल युगाने कमी केलंय. सध्याच्या स्थितीत एसएमई (स्मॉल अॅन्ड मिडियम इंडस्ट्रि) किंवा एखादा नव्याने सुरू झालेला व्यवसायदेखील वर्षानूवर्षे व्यवसाय करणाऱ्यांच्या बरोबरीला आलाय. एसएमई सेक्टर किंवा नव्या उद्योजकांना ऑनलाईन जाहिराती करण्याची संधी असून, ते आपला व्यवसाय नफ्यात आणू शकतात. डिजिटल मार्केटिंगची सर्वांत मोठी जमेची बाजू म्हणजे कोणत्याही कॉल सेंटर आणि इतर माध्यमांशिवाय तुम्ही थेट तुम्हाला हव्या असणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचू शकता. त्यामुळचं इतर माध्यमांच्या तुलनेत मार्केटिंगचा हा पर्याय उत्तम ठरतो आहे.

आपल्या बजेटनुसार जाहिराती शक्य
पूर्वी एखाद्या वर्तमानपत्रात किंवा टीव्ही चॅनेलवर आपली जाहिरात द्यायची म्हटली, तर छोट्या व्यवसायिकांच्या पोटात गोळा यायचा. त्यामुळं वर्षातून एखाद दुसऱ्या वेळी किंवा सवलतीच्या दरांत पुरवण्यांमध्ये जाहिराती करून व्यवसायिक आपलं मार्केटिंग करायचे. अन्यथा माऊथ पल्बिसिटी हाच एक छोट्या व्यवसायिकांचा आधार असायचा. जगभरात त्याहून वेगळी स्थिती नाही. गार्टनर्स डिजिटल मार्केटिंग स्पेंड रिपोर्टनुसार जगात ४० टक्के व्यवसायिकांनी डिजिटल मार्केटिंगमुळं आमची बचत झाल्याचं सांगितलय. तर २८ टक्के व्यवसायिकांनी पारंपरिक मीडियावर जाहिरातींसाठी होणार खर्च बंद करून आम्ही तो डिजिटल मीडियाकडे वळवणार असल्याचं सांगितलय. डिजिटलमध्ये मार्केटिंगच्या माध्यमातून थेट तुमच्या टर्गेटेड ऑडियन्सशी कम्युनिकेट करून त्यांच्याकडून रिझल्ट मिळवण्याची संधी असते. टर्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळण्याची हमी डिजिटल मीडिया देते. आता त्याला अतिशय प्रोफेशनल पद्धतीने कसा प्रतिसाद दिला जातो, त्यावर डिजिटल मार्केटिंगचं यश अवलंबून असतं. यामाध्यमातून येणाऱ्या ग्राहकाला योग्य सेवा दिली, तर निश्चितच व्यवसायवृद्धी दिसू लागेल. ग्राहक आणि व्यवसायिक यांच्यातील नाते संबंध दृढ करण्यातही याची मदत होऊ शकते.


 नफा वाढिला हातभार
व्यवसायातून नफा वाढविण्यात आणि त्याचा आलेख नेहमी चढा ठेवण्यात डिजिटल मार्केटिंग मोलाची भूमिका बजावते. व्यवसायिकाच्या गुंतवणुकीचा योग्य मोबदला या मार्गाने मिळू शकतो. तिपटीहून जास्त व्यवसाय वाढ होण्याची शक्यता यात आहे. 


ट्रस्ट आणि गुडविल
व्यवसाय वाढीबरोबरच बाजारात व्यवसायिकाचे चांगले नाव असणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी डिजिटल मीडिया अतिशय उपयुक्त ठरतो. यातील काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत.
  • अपेक्षित असणाऱ्या ग्राहकाला आपल्याकडे आकृष्ट करण्याची आणि आपल्याशी थेट जोडले जाण्याची संधी
  • व्यवसायिकाचे ग्राहकाशी नाते अधिक घट्ट होण्यास मदत
  • बाजारपेठेतील व्यवसायिकाची प्रतिमा उजळवण्याचे काम डिजिटल माध्यमातून शक्य
  • बाजारात एक ब्रँड म्हणून नावानुरूपास येण्यास मदत
  • सरते शेवटी यासगळ्याचा फायदा व्यवसाय वृद्धीसाठी

निष्कर्ष
बी-टू-बी अर्थात बिजनेस टू बिजनेस किंवा बी-टू-सी बिजनेस टू कस्टमर, या दोन्ही प्रकारच्या बिजनेसमध्ये डिजिटल मार्केटिंग यशस्वीरित्या राबवता येऊ शकते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सध्या डिजिटल मार्केटिंगमध्ये काय चालले आहे, हे लक्षात घेऊनच त्यांना पैसे द्यायचे आहेत. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, पेड जाहिराती, सोशल मीडिया मार्केटिंग, ई-कॉमर्स मार्केटिंग यांच्या माध्यमातून आपल्याला हवा तो रिझल्ट मिळवता येऊ शकतो. यातली कोणतीही गोष्ट खूप खर्चिक नाही. त्यामुळं पारंपरिक माध्यमांना बगल द्या आणि कास धरा डिजिटल मीडियाची.

पुढची पोस्ट डिजिटल मार्केटिंग आणि मोबाईल युजर्स